Paisa Fund Kaladalan

Directions Contact the museum

Paisa Fund Kaladalan पैसा फंड इंग्लिश स्कूल मधील आर्ट गॅलरी येथे कलारसिकांना चित्रे - शिल्पे विकत घेता येतील .

स्पेस टॉकचे सी ई ओ मिलिंद चिंगळे यांची पैसा फंड कलादालनाला भेट ▪️संस्थेच्या कला विषयक उपक्रमांचे कौतुक संगमेश्वर ( प्रति...
19/07/2026

स्पेस टॉकचे सी ई ओ मिलिंद चिंगळे यांची पैसा फंड कलादालनाला भेट

▪️संस्थेच्या कला विषयक उपक्रमांचे कौतुक

संगमेश्वर ( प्रतिनिधी ):- पुणे येथील ख्यातनाम स्पेस टॉक स्टुडिओचे सी ई ओ मिलिंद चिंगळे यांनी कुटुंबियांसमवेत शनिवारी सायंकाळी व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड कला दालनाला भेट दिली. संस्थेच्या सर्व कला विषयक उपक्रमाचे चिंगळे यांनी कौतुक केले.

पैसा फंड इंग्लिश स्कुलचे पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी संस्था आणि प्रशालेच्या वतीने मिलिंद चिंगळे यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी मिलिंद चिंगळे यांची स्थापत्य विशारद कन्या, पत्नी आणि अन्य कुटुंबीय, तसेच प्रशालेचे सेवक अनंत जाधव उपस्थित होते. प्रारंभी कला विभागतर्फे उभारण्यात आलेल्या ९ फूट उंचीच्या पेन्सिलची आणि त्यासमोरील अर्थपूर्ण चित्राची चिंगळे यांनी पहाणी केली.

सन २००८ - ०९ स्वतंत्र कलावर्ग आणि त्यानंतर उभारण्यात आलेल्या कलादालन उपक्रमाचा विद्यार्थ्यांना कसा लाभ झाला याबद्दल चिंगळे यांनी माहिती जाणून घेतली. याबरोबरच गेली २६ वर्षे विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रांचा ' कलासाधना ' हे चित्रकला वार्षिक पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची असणारी कला विषयातील प्रगती थक्क करणारी असल्याचे चिंगळे यांनी यावेळी नमूद केले.

पैसा फंड कलादालन चित्रकार ' पाथरे ' यांच्या कलाकृतीनी समृद्ध झाले असल्याचे चिंगळे यांनी नमूद केले. कलादालनात येणारी यापुढील चित्रे आपण अत्याधुनिक पद्धतीने फ्रेम करुन देवू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. व्यापारी पैसा फंड संस्था विद्यार्थ्यांमधील विविध प्रकारच्या कला जोपासण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याबद्दल चिंगळे यांनी समाधान व्यक्त केलं. मिलिंद चिंगळे यांच्या चिरंजीवाची तीन चित्र पैसा फंड कलादालनामध्ये लावण्यात आली आहेत , त्याचीही सर्व कुटुंबियांनी बारकाईने पाहणी केली. प्रशालेच्या कला विभागाला आणि कलादालनाला भेट दिल्या बद्दल संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी मिलिंद चिंगळे व त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद देवून कृतज्ञता व्यक्त केली.

पैसा फंड मध्ये स्मरण चित्राचे प्रात्यक्षिक▪️युवा चित्रकार प्रज्वल घडशी याची उपस्थिती संगमेश्वर दि . १८ ( प्रतिनिधी ):- व...
18/07/2026

पैसा फंड मध्ये स्मरण चित्राचे प्रात्यक्षिक

▪️युवा चित्रकार प्रज्वल घडशी याची उपस्थिती

संगमेश्वर दि . १८ ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे शासकीय रेखाकला परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकरीता कला वर्गात आज युवा चित्रकार प्रज्वल घडशी याने स्मरण चित्राचे प्रात्यक्षिक करुन दाखविले .

युवा चित्रकार प्रज्वल घडशी सध्या सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे येथे रंग व रेखाकला द्वितीय वर्षात शिकत आहे. प्रज्वलला बालपणापासून कलेची आवड असल्याने त्याने आपला चित्रकलेचा छंद जोपासण्यावर अधिक भर दिला. शालेय स्तरावर त्याने चित्रकलेत राज्य स्तरावरील पारितोषिके प्राप्त केली आहेत. कलेची आवड असल्यामुळे प्रज्वलने सह्याद्री कला महाविद्यालयात उच्च कलाशिक्षण घ्यायचे ठरवले.

सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी परवानगी दिल्यानंतर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना रेखा कला परीक्षेचे मार्गदर्शन करण्याच्या हेतूने प्रज्वल घडशी याने पैसा फंड इंग्लिश स्कूल येथे आज स्मरण चित्राचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शासकीय रेखाकला परीक्षेत विद्यार्थ्यांना स्मरणचित्र हा विषय काहीसा कठीण जातो, यामुळे पैसा फंडच्या कला विभागातर्फे या दोन विषयांच्या सरावावर सर्वाधिक भर दिला जातो . कलावर्गात १ जुलै पासून रेखाकला परीक्षेसाठी जादा तास सुरु झाले आहेत. कला विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो यासाठी आज स्मरण चित्र विषयाचे प्रात्यक्षिक युवा चित्रकार प्रज्वल घडशी यांने करुन दाखविले आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले .रेखाटन कसे करावे, ते करताना कोणती काळजी घ्यावी? जलरंगात काम करताना कोणती काळजी घ्यावी , याबाबत प्रज्वल याने सखोल मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांना प्रशालेत येवून प्रात्यक्षिक दाखविल्याबद्दल संस्था सचिव धनंजय शेट्ये , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आणि प्रशालेच्या कला विभागातर्फे युवा चित्रकार प्रज्वल घडशी याचे आभार मानण्यात आले .

पैसा फंड मध्ये स्थिर चित्राचे प्रात्यक्षिक▪️चित्रकार विष्णू परीट यांच्या कुंचल्याची कमाल ▪️कलावर्गातील विद्यार्थी भारावल...
18/07/2026

पैसा फंड मध्ये स्थिर चित्राचे प्रात्यक्षिक

▪️चित्रकार विष्णू परीट यांच्या कुंचल्याची कमाल
▪️कलावर्गातील विद्यार्थी भारावले

संगमेश्वर दि . १५ ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे जलरंग चित्रकार विष्णू परीट यांनी शासकीय रेखाकला परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या कला वर्गात आज स्थिर चित्राचे प्रात्यक्षिक करुन दाखविले . जवळपास दोन तासांच्या या जलरंग प्रात्यक्षिका दरम्यान विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकाचे चित्रकार परीट सर यांनी योग्य प्रकारे निरसन केलं.

चित्रकार विष्णू परीट हे माध्यमिक विद्या मंदीर सोनवडे येथून कला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. जलरंगांवर त्यांचे प्रभुत्व आहे. उत्कृष्ट निसर्ग चित्रकार म्हणून त्यांचा नांवलौकिक आहे. दररोज एक निसर्ग चित्र रेखाटून त्यांचा सराव सुरु असतो. सोनवडे सारख्या ग्रामीण भागात राहूनही त्यांनी आपल्या कला कौशल्याच्या जोरावर गावाचे नांव सर्वदूर पोहचवले. कला क्षेत्रात चित्रकार विष्णू परीट यांचे नांव आदराने घेतलं जातं.

शासकीय रेखाकला परीक्षेत विद्यार्थ्यांना स्थिर चित्र आणि स्मरणचित्र हे विषय काहीसे कठीण जातात यामुळे पैसा फंडच्या कला विभागातर्फे या दोन विषयांच्या सरावावर सर्वाधिक भर दिला जातो . कलावर्गात १ जुलै पासून रेखाकला परीक्षेसाठी जादा तास सुरु झाले आहेत. कला विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो यासाठी आज स्थिर चित्र विषयाचे प्रात्यक्षिक चित्रकार विष्णू परीट यांनी दाखविले आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले .रेखाटन कसे करावे, ते करताना कोणती काळजी घ्यावी? जलरंगात काम करताना कोणती काळजी घ्यावी , याबाबत परीट सर यांनी सखोल मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांना प्रशालेत येवून प्रात्यक्षिक दाखविल्याबद्दल संस्था सचिव धनंजय शेट्ये , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आणि प्रशालेच्या कला विभागातर्फे विष्णू परीट सर यांचे आभार मानण्यात आले .

पैसा फंडच्या रिषभ नरबेकरचे चित्र लाडोबा मासिकाचे मुखपृष्ठ ▪️रिषभची कला कौतुकास्पद संगमेश्वर दि. २० ( प्रतिनिधी ):- व्याप...
19/01/2026

पैसा फंडच्या रिषभ नरबेकरचे चित्र लाडोबा मासिकाचे मुखपृष्ठ

▪️रिषभची कला कौतुकास्पद

संगमेश्वर दि. २० ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वर या प्रशालेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या निढळेवाडी संगमेश्वर येथील रिषभ विश्वनाथ नरबेकर या विद्यार्थ्याने रेखाटलेले एका अप्रतिम चित्राची पुणे येथील चपराक प्रकाशनने त्यांच्या बाल कुमारांसाठी असणाऱ्या लाडोबा या जानेवारी महिन्याच्या मासिकाचे मुखपृष्ठ म्हणून निवड केली आहे. रिषभच्या या यशासाठी त्याचे अभिनंदन केलं जात आहे.

पैसा फंड इंग्लिश स्कुलने कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कलावर्ग आणि कलादालन हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होत आहे. कलासाधना चित्रकला वार्षिक, डिजिटल कला शिक्षण, विविध प्रात्यक्षिके, कला विषयक प्रोजेक्ट या सर्वांचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील कला शिक्षणासाठी उपयोग होत असतो. प्रशालेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करुन घेतला जाणारा सातत्यपूर्ण सराव हेच विद्यार्थ्यांच्या कला क्षेत्रातील यशाचे खरे गमक आहे. यामुळेच शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नेहमीच १०० टक्के लागून विद्यार्थी अ आणि ब श्रेणी प्राप्त करतात.

रिषभ विश्वनाथ नरबेकर हा नववीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी स्वभावाने शांत आणि नम्र असून त्याची चित्रकला चांगली असल्यामुळे त्याच्या कलेवर विशेष लक्ष दिल्यानंतर त्याच्या कलेत अधिक प्रगती होत असल्याचे दिसून आले. रिषभ याने ए्लिमेंटरी या शासकीय रेखाकला परीक्षेत अ श्रेणी प्राप्त केली आहे. गत वर्षी प्रशालेच्या कलासाधना या रौप्य महोत्सवी चित्रकला वार्षिकचे मुखपृष्ठ रिषभ यानेच केले होते. त्याने रेखाटलेल्या काही कलाकृती मधील कासवाचे चित्र पुणे येथील आघाडीच्या चपराक आणि लाडोबा प्रकाशनने जानेवारी २०२६ च्या त्यांच्या मासिकच्या मुखपृष्ठासाठी निवड करुन रिषभच्या कलेचा गौरव केला आहे.

चपराक प्रकाशनने पैसा फंड प्रशालेतील विद्यार्थी रिषभ विश्वनाथ नरबेकर याच्या चित्राचा असा आगळावेगळा सन्मान केल्याबद्दल संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी, रिषभचे पालक विश्वनाथ नरबेकर यांनी चपराक आणि लाडोबा प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील, ऑनलाईन संपादक ज्योती पाटील यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.तसेच रिषभ याच्या कलेचे कौतुक करुन त्याचे अभिनंदन केले आहे .

पडवे येथील नवोदय विदयालय विद्यार्थ्यांची पैसा फंडच्या कलादालनाला भेट ▪️ कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले ▪️ कलाविषयक उपक...
19/01/2026

पडवे येथील नवोदय विदयालय विद्यार्थ्यांची पैसा फंडच्या कलादालनाला भेट

▪️ कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले
▪️ कलाविषयक उपक्रमांबाबत घेतली माहिती

संगमेश्वर दि. १७ ( प्रतिनिधी ):- राजापूर तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी ते आठवी मधील ८० विद्यार्थ्यांनी शनिवार १७ जानेवारी रोजी व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला वर्ग आणि कलादालनाला भेट देऊन प्रशालेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कलाविषयक उपक्रमांची माहिती घेतली. कलादालनातील कलाकृती पाहून नवोदयचे विद्यार्थी भारावून गेले.

पडवे येथील नवोदय विद्यालय विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून आज या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या कला वर्ग आणि कलादालन उपक्रमाला भेट दिली. कला विभागातर्फे विद्यार्थ्यांना कला वर्गा समोर उभारण्यात आलेल्या पेन्सिलचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरतर्फे गत २५ वर्षे राबविल्या जाणाऱ्या कलासाधना या चित्रकला वार्षिक उपक्रमाची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. याबरोबरच कलाविषयक विविध उपक्रम, दैनंदिन सराव, शुभेच्छा पत्रांची निर्मिती, डिजिटल कलाशिक्षण याबाबत सर्व विद्यार्थ्यांना सखोल माहिती देऊन अवगत करण्यात आले. प्रशालेने सुरू केलेल्या कला वर्ग आणि कलादालन उपक्रमाचा कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना कसा लाभ झाला, याविषयी नवोदयच्या विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांसह माहिती देण्यात आली. हाताला उत्तम वळण येण्यासाठी विद्यार्थ्यांनी दैनंदिन सराव करावा असे आवाहन यावेळी कला विभागातर्फे या विद्यार्थ्यांना करण्यात आले.

पैसा फंड कलादालनात असणाऱ्या कलाकृती पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तरळलेला आनंद यावेळी दिसून आला. उत्साही विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतींसह पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कलाविषयक उपक्रमांबाबत नवोदयच्या विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली आणि यातील काही उपक्रम आम्ही स्वतः घरी गेल्यानंतर करण्याचा प्रयत्न करू असे विद्यार्थ्यांनी यावेळी नमूद केले . यावेळी प्रसिद्ध चित्रकार विष्णू परीट,जैतापूर हायस्कुलचे उपक्रमशील कलाशिक्षक कुणकवळेकर नवोदयचे विद्यालयचे कलाशिक्षक उन्मेष वेलिंगकर, क्रीडा शिक्षक साहिल यादव, सहाशिक्षिका श्रीयांका बोर्डीकर, आदिती वाघधरे हे उपस्थित होते. व्यापरी पैसा फंड संस्थे तर्फे सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी नवोदय विद्यलयचे सर्व शिक्षक आणि प्राचार्य एस. बस्वराज यांना पैसा फंड कलादालनाला भेट दिल्या बद्दल धन्यवाद देण्यात आले. यावेळी चित्रकार विष्णू परीट यांच्या निसर्ग चित्राचे प्रात्यक्षिक संगमेश्वर येथील जाखमाता मंदीर परिसरात आयोजित करण्यात आले होते.

कलाकाराच्या अंतर्मनातील उत्कट प्रतिमा त्यांच्या कलाकृतीत उमटते  : वैभव खेडेकर संगमेश्वर दि. १० ( प्रतिनिधी ):- कलाकाराचे...
10/01/2026

कलाकाराच्या अंतर्मनातील उत्कट प्रतिमा त्यांच्या कलाकृतीत उमटते : वैभव खेडेकर

संगमेश्वर दि. १० ( प्रतिनिधी ):- कलाकाराचे मन हे संवेदनशील असते. त्याच्या अंतर्मनात डोकावल्यानंतर त्याने रेखाटलेल्या कलाकृतीचा खरा अर्थ समजतो. कलाकाराच्या अंतर्मनातील उत्कट प्रतिमा त्याच्या कलाकृतीत उमटत असते, असे प्रतिपादन खेडचे माजी नगराध्यक्ष आणि राजवैभव पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले.

व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कलादालनाला भेट दिल्यानंतर येथील कलाकृतींची पाहणी करताना वैभव खेडेकर हे बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, स्नेह ज्योती विद्यालयचे उत्तम कुमार जैन, सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक अनिरुद्ध निकम, संतोष नलावडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, करण खेडेकर, राजवैभव पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदू साळवी, प्रदीप भोसले, दिनेश अंब्रे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना वैभव खेडेकर पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक शाळांना आपण भेटी दिल्या मात्र शाळेला जोडून असे भव्य कलादालन असणारे पैसा फंड हायस्कूल पाहून येथे कलेची आगळीवेगळी चळवळ सुरू असल्याचे स्पष्ट होते. उच्च कलाशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कला शिक्षणाचा पाया येथे अधिक मजबूत करण्यावर भर दिला जातो, हे अभिनंदनीय आहे. कलादालनात असणाऱ्या सर्वच चित्रांची आणि शिल्पांची वैभव खेडेकर यांनी बारकाईने पाहणी करून त्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक अनिरुद्ध निकम हे स्वतः कलासक्त आहेत. सह्याद्री कला महाविद्यालय आणि त्यांचे कलादालन भव्य दिव्य आहे. कलादालनाला भेट दिल्यानंतर अनिरुद्ध निकम म्हणाले की, पैसा फंड येथील अनेक विद्यार्थी आमच्या सह्याद्री कला महाविद्यालयात उच्च कला शिक्षणासाठी येतात, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. एवढेच नव्हे तर पैसा फंडचे विद्यार्थी असणारे अवधूत खातू हे आमच्या कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात, ही या संस्थेसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे, असे निकम यांनी नमूद केले.

स्नेह ज्योती अंधविद्यालयाचे उत्तम कुमार जैन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, कलाकारांनी रेखाटलेल्या येथील कलाकृती आपण काही पुस्तकांची मुखपृष्ठ म्हणून पाहिल्या आहेत. येथील कलाकृती एकापेक्षा एक सुंदर असून व्यापारी पैसा फंड संस्थेने विद्यार्थ्यांची कला जोपासण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला वर्ग आणि कलादालनाचा जो उपक्रम हाती घेतला, ही खरंतर काळाची गरज आहे.

फोटो ओळी :

१) पैसा फंड कलादालनात एका बहुचर्चित कलाकृतीची बारकाईने पाहणी करताना वैभव खेडेकर, संतोष नलावडे,उत्तम कुमार जैन, विनोद म्हस्के आदी मान्यवर

२) पैसा फंड कलादालनात कलाकृतींची पाहणी केल्यानंतर उपस्थित मान्यवर

( छाया : मिनार झगडे, संगमेश्वर )

Address

Sangameshwar
415611

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paisa Fund Kaladalan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to Paisa Fund Kaladalan:

Shortcuts

Share

Category