12/12/2025
श्री कर्णेश्वर महोत्सव २०२५
दिवस पहिला - नृत्यद्वैत
सादरकर्त्या - श्रुती आठल्ये, प्रणाली तोडणकर आणि सहकारी
सर्वांनी नक्की या..
#कर्णेश्वरमहोत्सव
रसिकहो नमस्कार !
कथ्थक आणि भरतनाट्यम हे दोन्ही शास्त्रीय नृत्य प्रकार भारतीय संस्कृती आणि अध्यात्मातून उगम पावले आहेत. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित हे दोन्ही नृत्य प्रकार स्वतःची शैली, तंत्रे आणि अभिव्यक्ती राखून आहेत. भरतनाट्यम हा दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार तर कथ्थक हा उत्तर भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. ही दोन्ही नृत्ये हा भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. या दोन्ही नृत्य प्रकारात काही मूलभूत फरक आणि काही साम्य स्थळे आहेत. गेली तीन वर्षे कथ्थक नृत्य सादरीकरणाने श्री कर्णेश्वराची व रसिकांची सेवा केल्यावर यावर्षी या दोन्ही नृत्य प्रकारांचे एकत्रित सादरीकरण करून यावर्षीच्या कर्णेश्वर महोत्सवाची सुरुवात करत आहोत. विजयादशमीच्या मुहूर्तावर यावर्षीच्या कर्णेश्वर महोत्सवाच्या तारखांची घोषणा आपण केली होती. आज दीपावली पाडव्यानिमित्त या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या "नृत्यद्वैत" या कार्यक्रमाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आपली उपस्थिती आणि आशीर्वाद प्रार्थनीय आहेच.
दीपावली शुभचिंतन!