Art Circle, Ratnagiri

Art Circle, Ratnagiri Art Circle, Ratnagiri is an organization working in cultural field in and around Ratnagiri. Established in 2008.

१६ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत आर्ट सर्कल फाऊंडेशन व CRPIM तर्फे 'स्वरभास्कर' बैठकीत चैतन्य,विशारद आणि नुपूर यांची मैफीलभारतीय...
13/08/2026

१६ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत आर्ट सर्कल फाऊंडेशन व CRPIM तर्फे 'स्वरभास्कर' बैठकीत चैतन्य,विशारद आणि नुपूर यांची मैफील

भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपणे व कलागुणांना अधिक वाव देणे या उद्देशाने ‘आर्ट सर्कल फाउंडेशन’ आणि ‘सेंटर फॉर रिसर्च अँड प्रमोशन ऑफ इंडियन म्युझिक’ (CRPIM) यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत विशेष ‘स्वरभास्कर’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे या सातत्यपूर्ण सांगीतिक उपक्रमाचे हे १६ वे वर्ष आहे. हा सुरेल सांगीतिक कार्यक्रम येत्या रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता, माधवराव मुळ्ये सभागृह, झाडगाव, रत्नागिरी येथे रंगणार आहे.
संगीताच्या या विशेष बैठकीमध्ये महाराष्ट्रातील नामांकित व गुणवंत युवा कलाकारांचे गायन रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये विशारद गुरव, चैतन्य परब व सुप्रसिद्ध गायिका नुपूर गाडगीळ आपल्या सुमधुर स्वरांनी ही मैफील सजवणार आहेत. शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील विविध रचनांचे सादरीकरण या बैठकीचे मुख्य वैशिष्ट्य ठरेल.
या बैठकीस उत्कृष्ट लय व स्वरांची जोड देण्यासाठी तबल्याची साथ अथर्व आठल्ये करणार असून हार्मोनिअमची साथ चैतन्य पटवर्धन सांभाळणार आहेत. या सर्वांच्या समन्वयातून रसिकांना एका अत्यंत समृद्ध आणि सुरेल सांगीतिक अनुभवाची अनुभूती लाभणार आहे.
रत्नागिरीतील सर्व संगीतप्रेमी, रसिक व नागरिकांनी १६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या बहारदार 'स्वरभास्कर' बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

‘शाम-ए-गझल'मैफलीने रसिक मंत्रमुग्ध; गौतमी वाडकर ठरली गझल गायन स्पर्धेची विजेतीरत्नागिरी:शब्दांची नजाकत आणि स्वरांचा लहेज...
27/04/2026

‘शाम-ए-गझल'मैफलीने रसिक मंत्रमुग्ध; गौतमी वाडकर ठरली गझल गायन स्पर्धेची विजेती

रत्नागिरी:

शब्दांची नजाकत आणि स्वरांचा लहेजा यांचा सुरेख संगम असलेल्या 'शाम-ए-गझल' या कार्यक्रमाने नुकतीच रत्नागिरीकरांची मने जिंकली. कला क्षेत्रातील प्रतिष्ठित 'आर्ट सर्कल फाउंडेशन'च्या वतीने कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष होते. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरी आणि सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे यांची सुश्राव्य मैफिल अनुभवायला मिळाली.

*चुरशीची स्पर्धा आणि निकाल*
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या चुरशीच्या स्पर्धेत स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस गझला सादर करून परीक्षकांची दाद मिळवली. या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे:
• प्रथम क्रमांक: गौतमी वाडकर (संगमेश्वर)
• द्वितीय क्रमांक: लीना खामकर (रत्नागिरी)
• तृतीय क्रमांक: प्रतीक्षा कोयंडे (कणकवली)
विजेत्यांना स्वराधिराज श्री. राजाभाऊ शेंबेकर आणि मुख्य परीक्षक दत्तप्रसाद रानडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

*दत्तप्रसाद रानडे यांची स्वरमैफिल व मार्गदर्शन*

दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध गझल गायक व संगीतकार दत्तप्रसाद रानडे यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. 'चुपके चुपके', 'काश ऐसा कोई मंजर होता' आणि 'एक होकार दे' यांसारख्या प्रसिद्ध गझला सादर करत त्यांनी मैफलीत रंग भरला.
यावेळी स्पर्धकांशी संवाद साधताना रानडे म्हणाले, "गझल सादर करताना आपण कविताच सादर करत आहोत, ही भावना महत्त्वाची आहे. सतत हरकती घेऊन गाणे म्हणजे गझल नव्हे, तर शब्दांच्या आशयावर आणि उच्चारांवर भर दिला पाहिजे."

या स्पर्धेला निखिल रानडे व प्रथमेश शहाणे (तबला) आणि चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम) यांनी पूरक साथसंगत केली. दत्तप्रसाद रानडे यांच्या मैफलीत हेरंब जोगळेकर (तबला) आणि उदय गोखले (व्हायोलिन) यांच्या वादनाने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. ध्वनिसंयोजनाची जबाबदारी एस. कुमार साऊंडच्या उदयराज सावंत यांनी नेहेमीप्रमाणे समर्थपणे पेलली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन कानविंदे यांनी केले. गझल प्रेमी आणि साहित्याची ओढ असणाऱ्या रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा 'स्मृती सोहळा' अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

कै. नलिनी प्रताप कानविंदे स्मृती गझल गायन स्पर्धा
26/04/2026

कै. नलिनी प्रताप कानविंदे स्मृती गझल गायन स्पर्धा

उद्या दुपारी ३ पासून.. चुकवू नये असा अप्रतिम कार्यक्रम.. जरूर या ✨
25/04/2026

उद्या दुपारी ३ पासून.. चुकवू नये असा अप्रतिम कार्यक्रम.. जरूर या ✨

येत्या रविवारी दुपारी ३ पासून..नक्की या ✨
22/04/2026

येत्या रविवारी दुपारी ३ पासून..नक्की या ✨

आपला सहभाग नोंदवला का ? शेवटचे ३ दिवस बाकी..
31/03/2026

आपला सहभाग नोंदवला का ? शेवटचे ३ दिवस बाकी..

*आर्ट सर्कलच्या वतीने गझल गायन स्पर्धेचे आयोजन**सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे करणार परीक्षण*आर्ट सर्कल रत्नागिरी ...
22/03/2026

*आर्ट सर्कलच्या वतीने गझल गायन स्पर्धेचे आयोजन*
*सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे करणार परीक्षण*

आर्ट सर्कल रत्नागिरी तर्फे यांच्या वतीने कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गझल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ ते ४० वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली असून मराठी, हिंदी किंवा उर्दू भाषेतील गझल स्वीकारली जाणार आहे.

स्पर्धकांनी आपली गझल ध्वनिमुद्रित करून नाव, वय व राहण्याचे ठिकाण नमूद करत *२ एप्रिल २०२६ पर्यंत* व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 8669 082 727 वर पाठवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कराओके किंवा लाईव्ह कार्यक्रमातील रेकॉर्डिंग स्वीकारले जाणार नाही. तानपूरा, हार्मोनियम व तबला या वाद्यांच्या साथीनेच ध्वनिमुद्रण अपेक्षित आहे.

प्राथमिक फेरीतून निवडलेल्या १० स्पर्धकांची यादी ९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल. *अंतिम फेरी २६ एप्रिल रोजी रत्नागिरी* येथे होणार आहे.

या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझल गायक श्री. दत्तप्रसाद रानडे करणार आहेत.

स्पर्धेत प्रथम ₹१०,०००, द्वितीय ₹७,००० व तृतीय ₹५,००० अशी पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आर्ट सर्कलच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक 7 आणि 8 फेब्रुवारी दोन दर्जेदार नाट्यकृती. चुकवू नका. सभासदांसाठी विनामूल्य, इतर सर्वांना देणगी मूल्य प्रवेशिका उ...
05/02/2026

दिनांक 7 आणि 8 फेब्रुवारी दोन दर्जेदार नाट्यकृती. चुकवू नका.
सभासदांसाठी विनामूल्य, इतर सर्वांना देणगी मूल्य प्रवेशिका उपलब्ध.
#मराठीनाटक
#समांतरंगभूमी

Address

3212, M. G. Road
Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Art Circle, Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to Art Circle, Ratnagiri:

Shortcuts

Share

Category