श्रीमंत सरदार पाटणकर घराणे, परगणे पाटण.

  • Home
  • India
  • Patan
  • श्रीमंत सरदार पाटणकर घराणे, परगणे पाटण.

श्रीमंत सरदार पाटणकर घराणे, परगणे पाटण. 🚩🌞श्रीराजा शिवछत्रपती विराजते🌙🚩

करवीरकर छत्रपती घराण्याकडून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला दिला जाणारा जरीपटका 🚩 #छत्रपती  #संततुका...
10/07/2026

करवीरकर छत्रपती घराण्याकडून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला दिला जाणारा जरीपटका 🚩

#छत्रपती #संततुकाराममहाराज #देहू #छत्रपतीशिवाजीमहाराज

न चुकवावी अशी पाक्षिक सभा पाक्षिक सभा========रविवार दि. १२ जुलै २०२६सायंकाळी - ६.०० ते ७.३०स्थळ - भारत इतिहास संशोधक मंड...
09/07/2026

न चुकवावी अशी पाक्षिक सभा

पाक्षिक सभा
========

रविवार दि. १२ जुलै २०२६
सायंकाळी - ६.०० ते ७.३०

स्थळ - भारत इतिहास संशोधक मंडळाचे पोतदार सभागृह, सदाशिव पेठ, पुणे

विषय - ' इराणचा बादशहा शाह अब्बासचे मुघल बादशाह औरंगजेबाला फर्मान ' (छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात)

सादरकर्ते : श्री. मनोज दाणी, श्री. गुरुप्रसाद कानिटकर

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६ #पालखीसोहळा२०२६  #देहू  #पंढरपूर
08/07/2026

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६

#पालखीसोहळा२०२६ #देहू #पंढरपूर

08/07/2026

काल ७ जुलै २०२६ रोजी आपली सहयोगी संस्था भारत इतिहास संशोधक मंडळाचा ११६ वा वर्धापन दिवस या दिवशी गुरुवर्य जेष्ठ इतिहास अभयस्क श्री.निनाद बेडेकर यांनी २००४ सालात दिलेली दुर्मिळ मुलाखत.

#भारतइतिहाससंशोधकमंडळ #पुणे #इतिहास

07/07/2026

सरदार पाटणकरांचा किल्ले दातेगड ( सुंदरगड )

ग्वाल्हेरचे सरदार पाटणकर घराणे.--------------------------------------------------             पाटणकर उर्फ साळुंखे घराणे ...
07/07/2026

ग्वाल्हेरचे सरदार पाटणकर घराणे.
--------------------------------------------------
पाटणकर उर्फ साळुंखे घराणे हे स्वराज्यस्थापनेच्या पूर्वीपासूनच एक पराक्रमी घराणं म्हणून नावारुपास होते.साळुंखे हे त्यांचे पूर्वीचे आडनाव. पूर्वकालीन चालुक्य राजवंशातील या घराण्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर पाटण परगण्याची जहागिरी मिळवली.पुढे याच पाटण वरून त्यांना पाटणकर नाव पडले.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज,छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात स्वराज्याच्या सेवेसाठी पिढ्यानपिढ्या मोलाचे योगदान दिले.
सरदार पाटणकर घराण्याचा वंशविस्तार सरदार नागोजीराव साळुंखे उर्फ पाटणकर,सरदार ज्योत्याजीराव साळुंखे,सरदार बहिरजीराव साळुंखे या मुळपुरुषांपासुन झालेला आपल्याला पहायला मिळतो. पुढे यांच्याच वंशातील सरदार हिरोजीराव पाटणकर, सरदार चांदजीराव पाटणकर,सरदार हणमंतराव पाटणकर,सरदार रामराव पाटणकर यांनी स्वराज्याची सेवा केली.वंशविस्तारामुळे सरदार पाटणकरांच्या शिक्केकरी वाडा पाटण, बीबी, केर, रामपूर,दिवशी बुद्रुक व खुर्द शाखा, सावंतवाडी, सातभाई(भाऊ) पाटणकर शाखा जांभूळवन, मनदुरे, वाजेगाव,ग्वाल्हेर या शाखा उदयास आल्या.
रामपूर शाखा हि ग्वाल्हेरकर सरदार पाटणकरांची पितृशाखा होय.रामपूर शाखेचे मुळपुरुष सरदार हणमंतराव पाटणकर हे सरदार चांदजीराव पाटणकरांचे कनिष्ठ बंधू.चांदजीराव व हणमंतराव हे दोन्हीही बंधु मोठे तलवारबहाद्दर.सरदार चांदजीराव यांनी 1692 मध्ये जिंजी मोहिमेत मोठा पराक्रम गाजवला यावर खुष होऊन छत्रपती राजाराम यांनी त्यांना संपूर्ण पाटण परगण्याची सनद दिली.अनेक मोहिमेत व उत्तरेकडील मुलुखांचा बंदोबस्त करण्यासाठी चांदजीराव हे आघाडीवर होते.आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच सरदार हणमंतराव पाटणकर हे आपल्या तलवारीची धार दाखविण्यात मागे नव्हते.सरदार हणमंतराव यांच्या शौर्यावर खुष होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना समशेरबहादूर हा किताब दिला.याच हणमंतरावांनी रामपूर शाखेची स्थापना केली.या ठिकाणी पाटणकरांचा वाडा आहे.रामपूर शाखेला सरदार पाटणकर घराण्याची धाकटी पाती म्हणून ओळखले जाते.याच रामपूर शाखेतील वंशज सरदार मानसिंगराव पाटणकर यांचे पुत्र श्रीमंत सरदार रामचंद्रराव उर्फ आप्पासाहेब पाटणकर यांनी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या पदरी राहून आपली कर्तबगारी बजावली.
श्रीमंत रामचंद्रराव यांच्या पराक्रम आणि मुत्सद्देगिरीमुळे शिंदे सरकारांची त्यांच्यावर विशेष मर्जी संपादन झाली.शिंदे दरबारातील एक बडे प्रस्थ म्हणून सरदार पाटणकरांचा नावलौकिक होता.सरदार पाटणकरांच्या कार्य कर्तृत्वावर खुश होऊन श्रीमंत महाराजा दौलतराव शिंदे व महाराणी बायजाबाईसाहेब यांच्या कन्या चिमणाबाईराजे साहेब यांचा विवाह श्रीमंत रामचंद्रराव पाटणकर यांच्याशी 1816 मध्ये लावून देण्यात आला.या विवाहानंतर श्रीमंत रामचंद्रराव पाटणकर यांना ग्वाल्हेर संस्थानकडून दरसाल सव्वा लक्ष रुपयांची जहागिरी मिळाली होती.तसेच संस्थानाकडून सरदार पाटणकरांना बरेच मान मरातब प्राप्त झाले. आपल्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी श्रीमंत रामचंद्रराव उर्फ अप्पासाहेब पाटणकर यांनी ग्वाल्हेरमध्येच आपले वास्तव केले.यांच्यापासूनच पुढे ग्वाल्हेरमध्ये सरदार पाटणकर घराण्याचा वंशविस्तार झाला.
------------------------------------------------------------
#ग्वाल्हेर_सरदार_घराणी
#सरदार_पाटणकर_घराणे
The Great Maratha-श्रीमंत महादजी शिंदे सरकार
©️प्रसाद शिंदे

🚩 पाटणकर पिता-पुत्रांना छत्रपती लिहितात, 'राज्याची पोटतिडीक तुम्हां लोकांस आहे. 🚩 ( पोस्ट मधील फोटोमध्ये काही शाब्दिक चु...
07/07/2026

🚩 पाटणकर पिता-पुत्रांना छत्रपती लिहितात, 'राज्याची पोटतिडीक तुम्हां लोकांस आहे. 🚩

( पोस्ट मधील फोटोमध्ये काही शाब्दिक चुका आहेत, AI ने तयार केल्यामुळे पुस्तकाच्या पानाचा ओरिजनल फोटो कमेंट बॉक्समध्ये देत आहे )

#सरदारपाटणकर #छत्रपतीशिवाजीमहाराज

🚩 श्रीमंत सरदार पाटणकर घराणे – पाटणच्या वैभवशाली इतिहासाचा गौरवशाली अध्याय 🚩सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पाटण नगरी ही शौर्...
06/07/2026

🚩 श्रीमंत सरदार पाटणकर घराणे – पाटणच्या वैभवशाली इतिहासाचा गौरवशाली अध्याय 🚩
सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पाटण नगरी ही शौर्य, स्वाभिमान आणि मराठेशाहीच्या परंपरेने नटलेली भूमी आहे. या भूमीच्या इतिहासात श्रीमंत सरदार पाटणकर घराण्याचे स्थान अत्यंत मानाचे आहे.
देशमुख म्हणून पाटण परिसरातील प्रशासन, न्यायव्यवस्था आणि जनकल्याणाची जबाबदारी या घराण्याने समर्थपणे पार पाडली. मराठा साम्राज्याशी निष्ठा, पराक्रम आणि कर्तव्यभावना या गुणांमुळे पाटणकर घराण्याने इतिहासात आपला वेगळा ठसा उमटवला.
पाटणमधील भव्य पाटणकर वाडा, दातेगडाशी असलेले ऐतिहासिक संबंध आणि या घराण्याने जपलेला सांस्कृतिक वारसा आजही त्या गौरवशाली परंपरेची साक्ष देतात.
इतिहास जपणे म्हणजे केवळ जुन्या आठवणी जपणे नव्हे, तर आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाला अभिवादन करणे होय.

#श्रीमंत_सरदार_पाटणकर #मराठेशाही

श्रीमंत सरदार पाटणकर
25/06/2026

श्रीमंत सरदार पाटणकर

Address

Patan

Telephone

+918805410489

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीमंत सरदार पाटणकर घराणे, परगणे पाटण. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to श्रीमंत सरदार पाटणकर घराणे, परगणे पाटण.:

Shortcuts

Share

Category