Savarkar Wada Bhagur Nashik

Savarkar Wada Bhagur Nashik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Savarkar Wada Bhagur Nashik, History Museum, Savarkarwada, Bhagur, Nashik.

07/04/2026

दिनांक ७ एप्रिल २०२६
अभिप्राय पर्यटक
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेली छत्रपती शिवराय यांची आरती चिरंजीव ऋत्विक वेसिकर याने सावरकर वाडा भगूर येथे भेट दिली असता वीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर उभे राहून सादर केली.
अतिशय सुंदर असा अनुभव आम्हाला आला त्याबद्दल त्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विशेष आभार

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाला राष्ट्रासाठी सर्वोच्च त्याग मानले. हे तिन्ही क्र...
23/03/2026

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाला राष्ट्रासाठी सर्वोच्च त्याग मानले. हे तिन्ही क्रांतिकारक केवळ व्यक्ती नव्हते, तर ते स्वातंत्र्याच्या जाज्वल्य ज्वालेचे प्रतीक होते.

हा भगतसिंग हाय हा !
जाशि आजी, फांशि आम्हांस्तवचि वीरा हाय हा !
राजगुरु तू हाय हा !
राष्ट्रसमरी वीर कुमरा पडसि झुंजत हाय हा !
हाय हा, जयजय अहा !...
जा हुतात्म्यांनो अहा !
साक्ष ठेवुनि शपथ घेतों आम्हि उरलों ते पहा !
शस्त्रसंगर चंड हा, झुंजवुनि कीं, जिंकुची स्वातंत्र्यविजयासी पहा !
हाय हा, जयजय अहा !!

(रत्नागिरी येथे वास्तव्यास असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या हुतात्म्यांच्या गौरवासाठी एक प्रेरणादायी गीत रचले होते.)

#भगतसिंह #भगतसिंग #राजगुरू #सुखदेव
#वीरसावरकर #सावरकर #सावरकरस्मारक #

भेट दिनांक २३ मार्च २०२६ उत्तराखंड- संस्थापक, सनातन महासंघ श्री डॉ. गौतम खत्तर यांची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास सदिच...
23/03/2026

भेट
दिनांक २३ मार्च २०२६
उत्तराखंड- संस्थापक, सनातन महासंघ
श्री डॉ. गौतम खत्तर यांची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास सदिच्छा भेट.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या वतीने स्मारकाचे व्यवस्थापक श्री भूषण कापसे यांनी सावरकर स्मारकाची माहिती देण्यात आली व स्वतंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती भेट देण्यात आली त्यावेळी स्मारकचे आकाशजी नेहरे, खंडूजी रामगडे
भेटीदरम्यान त्यांनी आपले विचार व्यक्त केले की आज स्वतंत्र विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थळ, ज्या जागेवर सावरकरांचा जन्म झाला तिथे येऊन धन्य झालो, ही अशी जागा आहे इथे आल्यावर त्या ऊर्जेचा अनुभव मिळतो व स्पंदन असल्याचा भास होतो की जी ऊर्जा सावरकरांच्या जीवनात होती.
मी अभिनंदन करतो की जी संस्था याची सांभाळ करती व देखरेख करती त्या संस्थेचे मनापासून अभिनंदन करतो.
आपण याच प्रकारे वीर सावरकरांच्या स्मृतीला जिवंत ठेवावे, आलेल्या देशभरातील लोकांना या जागेची प्रेरणा आपल्या प्रेरणेतून मिळत राहो

सावरकरांच्या विचारांचा वारसा आणि वसा जपणाऱ्या स्वामिनी विक्रम सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन .          #स...
21/03/2026

सावरकरांच्या विचारांचा वारसा आणि वसा जपणाऱ्या स्वामिनी विक्रम सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन .

#सावरकरस्मारक #सावरकर

“जात-पात विसरून, भेदभाव दूर सारून, हिंदू समाजाने एकत्र येऊया,आपली परंपरा, संस्कृती आणि एकता जपत सण-उत्सव आनंदाने आणि एको...
19/03/2026

“जात-पात विसरून, भेदभाव दूर सारून, हिंदू समाजाने एकत्र येऊया,
आपली परंपरा, संस्कृती आणि एकता जपत सण-उत्सव आनंदाने आणि एकोप्याने साजरे करूया!”

चला, सावरकरांच्या विचारांना कृतीत उतरवूया आणि एकसंध, शक्तिशाली हिंदू समाज घडवूया.

#हिंदू #हिंदुनववर्ष #गुढीपाडवा
#सावरकरस्मारक #वीरसावरकर #गणेशसावरकर #बाबारावसावरकर

गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
19/03/2026

गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे सुपुत्र, लेखक विश्वास विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!विश्वा...
17/03/2026

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे सुपुत्र, लेखक विश्वास विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

विश्वास सावरकर यांनी आपल्या प्रभावी लेखणीच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच इतर क्रांतिकारकांच्या आठवणी जिवंत ठेवल्या. त्यांच्या लिखाणातून इतिहासातील प्रेरणादायी घटना आणि राष्ट्रभक्तीची ज्वाला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली.

त्यांचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणादायी राहोत, हीच कृतज्ञ अभिवादन! 🙏

#सावरकरस्मारक #वीरसावरकर #गणेशसावरकर #बाबारावसावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान ते श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान डुबेरे अंतर
08/03/2026

स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान ते श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान डुबेरे अंतर

भेट भगूर येथे रंगपंचमीच्या दिवशीही पर्यटकांची गर्दी,  विश्वास मोटे यांची सावरकर स्मारकाला भेटभगूर (ता. नाशिक) : दिनांक ८...
08/03/2026

भेट
भगूर येथे रंगपंचमीच्या दिवशीही पर्यटकांची गर्दी, विश्वास मोटे यांची सावरकर स्मारकाला भेट
भगूर (ता. नाशिक) : दिनांक ८ मार्च २०२६ रोजी रंगपंचमीच्या दिवशीही स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारक, भगूर येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. अनेक पर्यटकांनी स्मारकाला भेट देत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्याची माहिती घेतली.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त विश्वास पांडुरंग मोटे यांनी आपल्या मित्रमंडळींसह स्मारकास भेट दिली. स्मारकातील मार्गदर्शक आकाश नेहरे यांनी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती दिली.
स्मारकातर्फे विश्वास मोटे यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती तसेच “आठवणी अंगाराच्या” हे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी भूषण कापसे, मनोज कुवर, शेखर जोशी आणि खंडू रामगडे आदी उपस्थित होते.
यावेळी अभिप्राय नोंदविताना विश्वास मोटे यांनी नमूद केले की, “महाराष्ट्र व भारतमातेच्या स्वातंत्र्य चळवळीतील रणसंग्रामाचे प्रणेते म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी लहानपणापासून अधिक जाणून घेण्याची एक अतृप्तता होती. आज भगूर येथे येऊन ती पूर्ण झाल्याचा आनंद व अभिमान वाटतो. सावरकरांचे विचार खऱ्या अर्थाने समजून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, दादर यांना मनःपूर्वक शुभेच्छा.”
रंगपंचमीच्या दिवशीही मोठ्या संख्येने पर्यटकांनी भगूर येथील सावरकर जन्मस्थान स्मारकाला भेट दिल्याने स्मारक परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

भेट आज दिनांक 5 3 2026 रोजी 4:30 वाजता श्री रवींद्र माधव साठे ( सभापती राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्...
05/03/2026

भेट
आज दिनांक 5 3 2026
रोजी 4:30 वाजता श्री रवींद्र माधव साठे ( सभापती राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ) यांची स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमी स्मारकास सदिच्छा भेट यावेळी स्मारकाच्या वतीने श्री आकाश नेहरे यांनी भाषाशुद्धी हे पुस्तक भेट म्हणून दिले यावेळी स्मारकाची माहिती देण्यात आली भगूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रसाद आडके व्यवस्थापक श्री भूषण कापसे, खंडू रामगडे व अन्य कर्मचारी वृंद उपस्थित होते

04/03/2026

काहीतरी करून दाखवायचं अशी जिद्द
तात्यारावंचा जन्म झाला त्याच गावातील महिला सौ चंद्रकला ताई कमळाकर शिंदे यांनी फेटा बांधण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष सौ मंजिरी ताई मराठे यांची परवानगी घेतली व पहिला फेटा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मूर्तीला बांधेल आणि मगच मी माझ्या व्यवसायाला सुरुवात करेल.
फेटा बांधल्यानंतर सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले, स्मारकाच्या वतीने त्यांचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
असेच माझ्यासारखे कार्य करून बाकी महिलांनी असाच किंवा दुसरा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहावे अशी अशा व्यक्त केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान भगूर हे नाव घेतले की आपल्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची छबी आपल्या डोळ्यासमोर ...
02/03/2026

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान भगूर हे नाव घेतले की आपल्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची छबी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये देखील महिलांना सदैव आदराचे स्थान असावे त्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि त्यांचे प्रामाणिक मतही होते त्यासाठी देखील त्यांनी आपले विचार कृतीतून काम करून कार्य केले त्यासाठी त्यांनी विधवा महिलांचे किंवा सुवासिनींचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम असो स्नेहभोजन असो अथवा अन्य ठिकाणी देखील महिलांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे यासाठी ते प्रयत्नशील होते आपल्या भगूर मधील देखील यापूर्वी शुभकार्यामध्ये किंवा लग्न कार्यामध्ये अथवा धार्मिक कार्य असेल त्यासाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीतील महत्त्वाचा भाग म्हणजे फेटा पूर्वी भगूर मध्ये फेटे बांधणारे कोणी मिळत नव्हते अथवा जे होते ते वेळेवर उपलब्ध होत नव्हते अशा स्थितीमध्ये एक नवीन क्रांती झाली व चंद्रकलाताई कमळाकर शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन फेटा बांधायचे शिकले काही कालांतरानंतर त्यांना यश देखील त्या क्षेत्रामध्ये आले परंतु त्यांची एक इच्छा होती की मी माझ्या कार्याचा शुभारंभ आपल्या भगूर मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळावरील प्रतिमेला फेटा बांधून करेल चंद्रकला ताई यांनी यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी ला देखील त्यांनी स्मारकात येऊन आकर्षक अशी रांगोळी देखील काढली होती चंद्रकला ताई शिंदे यांनी समाजसेवेच्या माध्यमातून आपले कार्य निरंतर चालू ठेवण्याचे ठरविले आहे त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीतील पहिल्या महिला आहेत ज्यांनी फेटा बांधायला शिकून आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे ताईंनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरीताई मराठे यांच्याशी संपर्क केला आणि त्यानंतर त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. स्मारकाकडून देखील परवानगी मिळताच शुभस्य शीघ्रम या वाक्यानुसार त्यांनी आज आपला संकल्प कृतीतून आणला आज दिनांक २ मार्च २०२६
रोजी सायंकाळी स्मारकात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला फेटा बांधून सुरुवात केली औक्षण केले तसेच पूजन देखीलही केले यावेळी त्यांनी फेटा बांधून झाल्यानंतर माझ्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण झाली असे मत व्यक्त केले व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई व स्वातंत्र्यवीर सावरकरवीर
सावरकर जन्मस्थळ भगूर यांचे देखील विशेष आभार मानले त्यावेळी सावरकर स्मारकाचे व्यवस्थापक श्री भूषण कापसे श्री आकाश नेहरे, खंडू रामगडे विजय घोडेकर सुभाष पुजारी दीपक गायकवाड परीक्षेत जोशी श्याम कोथिंबीरे आदी स्थानिक भगूरकर नागरिक उपस्थित होतेस्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान भगूर हे नाव घेतले की आपल्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची छबी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये देखील महिलांना सदैव आदराचे स्थान असावे त्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि त्यांचे प्रामाणिक मतही होते त्यासाठी देखील त्यांनी आपले विचार कृतीतून काम करून कार्य केले त्यासाठी त्यांनी विधवा महिलांचे किंवा सुवासिनींचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम असो स्नेहभोजन असो अथवा अन्य ठिकाणी देखील महिलांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे यासाठी ते प्रयत्नशील होते आपल्या भगूर मधील देखील यापूर्वी शुभकार्यामध्ये किंवा लग्न कार्यामध्ये अथवा धार्मिक कार्य असेल त्यासाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीतील महत्त्वाचा भाग म्हणजे फेटा पूर्वी भगूर मध्ये फेटे बांधणारे कोणी मिळत नव्हते अथवा जे होते ते वेळेवर उपलब्ध होत नव्हते अशा स्थितीमध्ये एक नवीन क्रांती झाली व चंद्रकलाताई कमळाकर शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन फेटा बांधायचे शिकले काही कालांतरानंतर त्यांना यश देखील त्या क्षेत्रामध्ये आले परंतु त्यांची एक इच्छा होती की मी माझ्या कार्याचा शुभारंभ आपल्या भगूर मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळावरील प्रतिमेला फेटा बांधून करेल चंद्रकला ताई यांनी यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी ला देखील त्यांनी स्मारकात येऊन आकर्षक अशी रांगोळी देखील काढली होती चंद्रकला ताई शिंदे यांनी समाजसेवेच्या माध्यमातून आपले कार्य निरंतर चालू ठेवण्याचे ठरविले आहे त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीतील पहिल्या महिला आहेत ज्यांनी फेटा बांधायला शिकून आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे ताईंनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरीताई मराठे यांच्याशी संपर्क केला आणि त्यानंतर त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. स्मारकाकडून देखील परवानगी मिळताच शुभस्य शीघ्रम या वाक्यानुसार त्यांनी आज आपला संकल्प कृतीतून आणला आज दिनांक २ मार्च २०२६
रोजी सायंकाळी स्मारकात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला फेटा बांधून सुरुवात केली औक्षण केले तसेच पूजन देखीलही केले यावेळी त्यांनी फेटा बांधून झाल्यानंतर माझ्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण झाली असे मत व्यक्त केले व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई व स्वातंत्र्यवीर सावरकरवीर
सावरकर जन्मस्थळ भगूर यांचे देखील विशेष आभार मानले त्यावेळी सावरकर स्मारकाचे व्यवस्थापक श्री भूषण कापसे श्री आकाश नेहरे, खंडू रामगडे विजय घोडेकर सुभाष पुजारी दीपक गायकवाड परीक्षेत जोशी श्याम कोथिंबीरे आदी स्थानिक भगूरकर नागरिक उपस्थित होते

Address

Savarkarwada, Bhagur
Nashik
422502

Opening Hours

Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Savarkar Wada Bhagur Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category