13/05/2025
मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन दि.१० मे ते १४ मे २०२५ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मॅकॅन वल्ड ग्रुपचे सिनीअर क्रिएटिव्ह डिरेक्टर-आर्ट, विक्रम ढेंबरे यांच्या शुभहस्ते झाले.
मुंबईसह पुणे, सातारा, रत्नागिरी शाखेतील विद्यार्थ्यांचे अप्लाईड आर्टचे काम या प्रदर्शनात आहे.
दि.१२ मे रोजी मंथन आर्ट स्कूलचे डिरेक्टर शशिकांत गवळी यांचे ‘आर्ट स्कूलला प्रवेश घेण्यापूर्वी’ याविषयी विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शन असणार आहे.
दि.१३ मे रोजी अक्षय पंडीत यांचे ‘ए आय’ विषयी मार्गदर्शन होणार आहे. आणि दि.१४ मे रोजी अमर काळे यांचे ‘डिजीटल इल्यूस्ट्रेशनवर डेमोस्ट्रेशन’ होणार आहे.
कलाप्रेमी,आवड असणार्या विद्यार्थी-पालकांना या प्रदर्शनाचा व शिबीराचा लाभ घेता येणार आहे.