मराठा साम्राज्य

मराठा साम्राज्य मराठा साम्राज्य

या हरामखोराला शोधाशिवप्रेमींनो....सावध हा चीटर महाराजांच्या नावाने फसवत आहे....मुख्य फसवणूकदार-- Krishna Jagtap Patil ना...
27/01/2026

या हरामखोराला शोधा

शिवप्रेमींनो....सावध हा चीटर महाराजांच्या नावाने फसवत आहे....
मुख्य फसवणूकदार-- Krishna Jagtap Patil नावाने फेसबुक अकाउंट होते....
छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अर्ध्या किमतीत देण्याचे आमीस दाखवून हा चीटर लोकांना सर्रास फसवत आहे....
कधी याच्या स्कॅनर वर *भगवान संपतराव सोळंके* नाव येत आहे....
तर कधी *पवन बालासाहेब वावरे* असे नाव येत आहे....
त्याचा मो. नं. 8855974233 हा आहे...
महाराजांच्या पवित्र नावाचा वापर करून जो कोणी फसवा धंदा चालवत आहे तो महाराष्ट्राचा आणि महाराजांचा गद्दार आहे.... हा शिवद्रोह सहन केला जाणार नाही....
या गद्दारांना कायदेशीर मार्गाने धडा शिकविल्याशिवाय आपण शांत बसणार नाही....
प्रत्येक शिवभक्ताला नम्र विनंती
या व्यक्तीच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि हा फसवणुकीचा मेसेज आपल्या सर्व ग्रुपमध्ये आणि मित्रांना त्वरित पाठवा....
एक व्हा सतर्क व्हा फसवणूक थांबवा....
जय जिजाऊ जय शिवराय

जगातील पहिला सर्जिकल स्ट्राइक.५ एप्रिल १६६३ च्या रात्री लाल महालात लाखाच्या फौजेत एक मरहट्टा घुसला अन तो वाघ प्रति औरंगज...
05/04/2025

जगातील पहिला सर्जिकल स्ट्राइक.

५ एप्रिल १६६३ च्या रात्री लाल महालात लाखाच्या फौजेत एक मरहट्टा घुसला अन तो वाघ प्रति औरंगजेब 'मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब ए बंगाल शाहिस्तेखान अबू तालिब' याची बोटे छाटून बाहेर पडला.

जीवावर आले ते बोटांवर निभावले✌️♥️🚩

#सर्जिकल_स्ट्राइक

काल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेला उपचार नाकारले.दहा लाख रुपये नाहीत म्हणून त्या महिलेला...
05/04/2025

काल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेला उपचार नाकारले.दहा लाख रुपये नाहीत म्हणून त्या महिलेला दवाखान्यात उपचार नाकारले. नंतर दुसऱ्या दवाखान्यात ती महिला मरण पावली. दोन जुळ्या बाळांना जन्म देऊन त्या बाळांची आई मरण पावली. पैसे नाहीत म्हणून मरणप्राय वेदना होत असलेल्या एका ताईला दिनानाथ मंगेशकर या एका संगीतकाराच्या नावाने असलेल्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश दिला जातं नाही, तिच्या आक्रोशाने या संगीतकाराच्या नावाने असलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरचे हृद हेलावत नाही अशी माणसासारखी दिसतात म्हणून माणसं म्हणायच्या लायकीची लोक दवाखान्यात स्त्रीरोग तज्ञ् असतात हे बघून दुःख संतापाच्या भावना आहे.

हे सगळं ऐकलं पाहिलं आणि मला आमच्या गावच्या पेराआजीची आठवण झाली.अजिबात शाळा न शिकलेली आमची पेराआजी माणूस म्हणून किती थोर होती हे आम्ही अनुभवल.. आज ती नाही. तिचे शब्दचित्र दिव्य मराठी मध्ये लिहिले होते. माझ्या मुलुखमाती पुस्तकातही हे शब्दचित्र आहे..

स्त्रीरोग तज्ञ् ची डिग्री असूनही माणुसकी विसरणारे संवेदनाशून्य डॉक्टर आणि बाळंतिणीची वेदना ऐकून घायाळ होणारी, पळत जाऊन बाळंतीणीची सोडवणूक करणारी आमच्या गावची पेराआजी... आज तिची आठवण येते..

तिने उभ्या आयुष्यात पंधराशेच्या वर बाळंतपणं केली. रात्री-अपरात्री, हातातलं काम सोडून, तोंडातला घास टाकून तिने अडल्या घरी धाव घेतली. आणि त्या बदल्यात जोंधळा आणि चोळीच्या खणावर समाधान मानलं...

बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या लेकीचे दिवस भरल्यावर घरातले सगळेच काळजीत असतात. रात्री-अपरात्री जर मुलीच्या पोटात दुखायला लागले, तर काय करायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. पण ज्या गावात पेराबाई असते, त्या गावात मात्र मुलीचे आईवडील निश्चित असतात. त्यांना कसलीच काळजी नसते. मुलीच्या पोटात दुखायला लागल्यावर ती नवऱ्याला सांगते,
‘आव जावा, पेराबाईला घेऊन या’
तो उठून पेराबाईच्या घरी जातो. दारात उभा राहून आत पाहून आवाज देतो,
‘पेरामावशी मी हाय. पोरीच्या पोटात दुखायला लागलंय.’ ते ऐकून पेराबाई उठून चालायला लागते. पेराबाई त्याच्या पुढं चार पावलं चालत असते. तिला त्या अवघडलेल्या पोरीची काळजी लागलेली असते. घरात आल्यावर पेराबाई मुलगी, ज्या खोलीत असते, तिथं जाते. बाहेर मुलीचा बाप काळजीत असतो. पंधरा-वीस मिनिटांनंतर आतून मूल रडल्याच आवाज कानावर येतो, बाहेर पोरीचा बाप सुस्कारा टाकतो. पेराबाई बाहेर येते आणि म्हणते,
‘जीव मोकळा झाला’ हा खास तिचाच शब्द.
पुन्हा तीच म्हणते,
‘नातू झाला, बघ तुला. पोरीच्या सासरी कळवा’
‘मावशी, तुम्ही हुता म्हणून बरं. न्हायतर रात्रीचं काय करणार हुतो, आम्ही’
या प्रसंगातील पेराबाई म्हणजे, पेराबाई बाळू गोतपागर. सांगली जिल्ह्यातील रामापूर गावची. सुईणीचं काम करणारी. तिनं आजवरच्या आयुष्यात पंधराशेच्या वर बाळंतपणं केलेली आहेत. ही बाळंतपणं करताना एकही ‘गहाळ’(हा शब्द पेराबाईचा) झालेलं नाही, म्हणजे बाळंतपणादरम्यान मूल किंवा आई सुखरूप राहिली आहेत. औपचारिक अर्थानं कसलही शिक्षण न घेतलेल्या, पेराबाईंनी गावातील आणि पंचक्रोशीतील बाळंतपणं केलेली आहेतच, पण अनेक वेळा तालुक्याच्या गावातील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनीही एखाद्या अवघड वाटणाऱ्या केसमध्ये त्यांना बोलावून त्यांची मदत घेतली आहे. नव्हे, डॉक्टरांना अवघड वाटणारी डिलिव्हरी पेराबाईंनी सोपी केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन शरीरशास्त्राचा कसलाही अभ्यास न केलेल्या, पेराबाईच्या सुईणपणाच्या गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत.

‘तुम्हाला जमतं कसं?’
यावर त्या एका वाक्यात सांगतात,
‘तसंच’
इतकी वर्षं हे काम करूनही त्यांना काही विशेष वाटत नाही. त्यांची मुलाखत घेतल्यावर त्यांचा फोटो काढायला लागलो, तर म्हणाल्या. ‘माझा फोटो कशाला घेताय?’ मी फोटो काढतोय, हे त्यांना वेगळंच वाटत होतं. तासा-दीड तासाच्या मुलाखतीत, त्यांनी त्यांच्याबद्दलची बरीच माहिती सांगितली.

त्या म्हणाल्या, ‘गावात एक आऊ नावाची म्हातारी हुती. मी नांदायला आल्यावर तिच्याजवळ बसायला जात हुते. ती सुईण होती. तिला माणसं बोलवायला यायची. एक दिवस ती मला घेऊन गेली. लई अवघड बाळतपण हुतं. पण आऊनं तिचं सुखरूप बाळंतपण केलं. मग मी वरीसभर तिच्यासोबत जात हुते. ती मला कंबर धरायला लावायची. एक दिवस आऊनं मलाच, एक बाळंतपण करायला लावलं. आऊ सांगंल तशी, मी करत हुते. शेवटी ते बाळंतपण झालं. त्या दिवशी आऊ मला म्हणाली, ‘पोरे, आजपासून तूच हे काम करायचं.’ त्यानंतर आठ-दहा वेळा आऊ सोबत आली. पुन्हा माझी मीच एकटं जायला लागले. मला एकटीला सुईणपण जमायला लागलं. एखाद्याचा जीव मोकळा करण्यात मला पुण्य वाटायला लागलं.’
सुईणीचं काम करताना पेराबाईला आलेले अनेक अनुभव त्यांनी सांगितले.

एका घरात त्या बाळंतपण करायला गेल्या होत्या. त्या आत गेल्या. जिचं बाळंतपण होतं, तिला खूप वेदना होत होत्या. तिनं त्या रागात जवळ आलेल्या पेराबाईचा कडकडून चावा घेतला. रुपयाएवढा तुकडा निघाला. त्या रक्तबंबाळ झाल्या, एवढं होऊनही पेराबाई त्या मुलीवर रागावल्या नाहीत. जखमेची पर्वा न करता, त्यांनी त्या मुलीचं बाळंतपण केलं. ते झाल्यावरच त्या दवाखान्यात उपचारासाठी गेल्या. त्या म्हणतात, ‘त्या पोरीला कळ सोसली न्हाय, काय करणार?’ त्याचं हे म्हणणं ऐकल्यावर क्षमाशीलता जगणाऱ्या या बाईबद्दलचा आदर खूपच वाढतो.

ज्या काळात गावात दळणवळणाची साधनं नव्हती. डॉक्टर नव्हते, त्या काळात पेराबाई गोतपागर यांनी केलेलं काम खूप मोलाचं आहे. त्या अभिमानान सांगतात ‘माझ्या हातून याकबी गहाळ झाल्यालं न्हाय.’

अजून एक अनुभव त्यांनी सांगितला. ‘गावाच्या बाहेर भटक्यांची पालं उतरली होती.त्यांच्यात एक गरोदर बाई होती. तिच्या पोटात दुखायला लागलं, तेव्हा तिचा नवरा गावात आला. सुईणीची चौकशी करायला लागला. पेराबाईची माहिती कळल्यावर तो पेराबाईच्या घरी गेला. मग पेराबाई त्याच्यासोबत पालावर गेल्या. तिथं त्या बाईला धीर देत, तिचं बाळंतपण केलं. पण तेवढ्यावरच ती थांबली नाही. एका लेकीसाठी आईनं जे करायला पाहिजे, ते सगळं तिनं केलं. त्या बाईला गरम पाण्यानं अंघोळ घालण्यापासून ते तिला चांगलंचुंगलं खायला घालण्यापर्यंत सगळी जबाबदारी तिनं पार पाडली. यावर त्या सहजपणे म्हणतात, ‘आपलीच लेक असती, तर केलं असतं का न्हाय? बाळंतपण म्हंजी दुसरा जन्म असतुया बाईचा, तवा जायाचं न्हाय तर कवा जायाचं?’ त्या काळात पेराबाई एवढं जोखमीचं काम करत होती. बोलवायला आलं तेव्हा, लेकीसुनांच्या सोडणुकीसाठी धावून जात होती. अगदी सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना नर्सना अवघड वाटणारी डिलिव्हरी तिने तिच्याजवळ असलेल्या पारंपरिक ज्ञानाच्या बळावर सोपी केली होती. हे अवघड काम करण्याच्या बदल्यात पेराबाईला काय मिळत होतं? असा प्रश्न आजच्या महागड्या प्रसूतिगृहाच्या दरांच्या पार्श्वभूमीवर पडतो. हा प्रश्न मी त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘एक बाळंतपण केलं, की पायल्या-दोन पायल्या जुंधळं मिळायचं. एखादा चोळीचा खण मिळायचा.’
बाळंतपणासारखी अवघड कामं, रात्री-अपरात्री जाऊन, कधी जेवत्या ताटावरून उठत तसाच हात धुऊन उठणारी, एखाद्याच्या पोरगीचं पोट दुखतंय हे ऐकल्यावर, त्या पोरीचा जीव सोडवायला पळत जाणारी पेराबाई ही ग्रेट बाई आहे. तिने केवळ जोंधळ्यावर आणि चोळीच्या खणावर शेकडो घरांवर डोंगराएवढे उपकार केले आहेत. ही बाई किती मोठी आहे, हे ज्यांच्या घरात जाऊन तिनं बाळंतपण केलं आहे, त्यांना माहिती आहे. पण तिच्या या मोठेपणाचं चीज झालेलं नाही. तिनं आजवरच्या आयुष्यात केलेले काम किती मोठं आहे, हे तिलाही माहीत नाही. ती सहजपणे म्हणते, ‘मला जमतंय तर नको का करायला?’ स्वत:च मोठेपणा न मिरवणारी ही नि:स्पृह म्हातारी आहे. आता पेराबाई थकलीय. गेल्या दोन वर्षात तिने सुईणीच काम बंद केलंय. मला म्हणाली, ‘पोरा, ताकद न्हाय राहिली रं अंगात. आजपातूर कुणाच आरं म्हणून घेतलेलं न्हाय. आता म्हातारपणी कशाला म्हणून घ्याचं? म्याच लोकास्नी सांगती, मला न्हाय जमत म्हणून.’

पेराबाई रस्त्यावरून निघालेली असते. एक गाडीवाला जवळ येऊन थांबतो. विचारतो, ‘पेराआज्जे वळखलं का?’
पेराबाई त्याच्याकडं बघते.
‘न्हाय बाबा. कुणाचा रं तू?’
मग तो ओळख सांगतो.
पटकन काहीतरी आठवल्यासारखं करून ती म्हणते ‘आरं बाळा तू हायीस व्हय? आर म्या आंघोळ घातलिया तुला. कुठं अस्तुस? लगीन याव झालं का?’

आजी त्या पोराची आस्थेनं चौकशी करत राहते. तिच्यासमोर सगळा भूतकाळ उभा राहिलेला असतो. ते पोरगं खाली वाकतं, तिच्या पाया पडतं. तिचा खडबडीत हात त्याच्या डोक्यावरून फिरत राहतो. ते दृश्य पाहून रस्त्यान जवळून जाणारा हेलावतो. त्या पोराला आशीर्वाद देऊन पेराबाई निघून जाते. ती गेलेल्या दिशेला पोरगं बघत राहतं. ते घरात जाऊन आईला सांगणार असतं...
‘आये, मला आज पेराआज्जी भेटली व्हती.’
Sampat More
लेखक- संपत लक्ष्मण मोरे

महाराज अनंतात विलीन झाले नाहीत,अनंतांच्या हृदयात विराजमान झाले आहेत...जय शिवराय 🙏 महाराजांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभ...
03/04/2025

महाराज अनंतात विलीन झाले नाहीत,
अनंतांच्या हृदयात विराजमान झाले आहेत...

जय शिवराय 🙏
महाराजांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
मराठा
हिंगोली सकल मराठा समाज

हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्...
23/03/2025

हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.

भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.

समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.

कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली…

भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.
Yuvraj Sambhaji Chhatrapati
Swarajya Maharashtra

कोणी पडो अथवा ना पडो हा 52 कुळे पडला पाहिजे  #मराठ्यांनो मराठा Chandrashekhar Bawankule CMOMaharashtra Ajit Pawar
05/11/2024

कोणी पडो अथवा ना पडो हा 52 कुळे पडला पाहिजे #मराठ्यांनो
मराठा
Chandrashekhar Bawankule
CMOMaharashtra
Ajit Pawar

25/10/2024

तिकीट जरी मुंबई,दिल्लीहून आणले तरी एक वारी अंतरवाली सराटीची करावीच लागत आहे...

नुसती बेजारी..😜

20/10/2024

महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न चालत नसतो फु*निचांनो....
इथे फक्त जरांगे पॅटर्न चालत असतो..
🚩🚩🚩🚩🚩🚩

Address

Basmat
431512

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा साम्राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to मराठा साम्राज्य:

Share