12/10/2024
*दसऱ्याची लीळा - दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करणे.*
*अचलपूर* , (अजळपूर) जि. *अमरावती*
*सिमोलंघना बिजें करणे : :* दसरेयाचा दिसी गोसावियांसि मर्दना मादने जालें : पूजा जालीः आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मग भवरा घोडेयावरि आरोहण जालें : सोनेभरी कबाय घातलीं : पाटाउ दुटीः श्रीमुगुटी सोनेसळाः चुनडीः वरि फुलें : पुढे गोसावियांचा घोडाः मागा रामदरणेयाचा घोडाः तयामागां रामदरणेयाचा परिवारः ऐसें उत्तरेचेनि दारवंठेनि बिजें केलें : नगराबाहीर तळेयाचिये उत्तरीली पाळीवरि अंबिठा होताः तेथ गोसावी घोडेयाखालुते उतरलें : पांच पोफळं आणि तांदूळ तेयाखाली घातलेः मग “ सोने घेयाः सोने घेयाः " म्हणौनि अनुवाद केलाः तेथ काही वेचिलें : मग प्रदक्षिणा केली : आणि गोसावी बिजें केलें : रामदरणेयाचीया माता गोसावियांसि ओवाळणी केलीः हे चरित्र शोधीचें ::
*मराठी अर्थ*
सर्वज्ञांचे अचलपूरला वास्तव्य असतांना दसऱ्याच्या दिवशी सकाळीच मंगल स्नान झाले. पुजा झाली. भोजन झाले. मग सीमोलंघनाच्या वेळेवर सर्वज्ञांना घोड्यावर विनंतीपूर्वक बसविले. उत्तम जरतारी झालरीचे वस्त्र. श्रीमुगुटावर जरतारी पगडी परिधान केली. पुष्प हार अर्पण केले. सोबत सुवर्ण मोहरांनी भरलेली टोपली, पुढे सर्वज्ञांचा घोडा त्यामागे राजा रामदरणा घोड्यावर बसला. त्यामागे सर्व सरदार लावलष्करासहीत थाटामाटात निघाले. अशी ही मिरवणूक गावाच्या उत्तर नगरमहाद्वारातून नगरारच्या उत्तर दिशेला गेली. गावाच्या उत्तर दिशेला एक तळे होते. तळ्याच्या उत्तर काठावर आपट्याचे झाड होते. त्या ठिकाणी सर्वज्ञ घोड्यावरून खाली उतरले. त्या ठिकाणी पाच सुपाऱ्या अक्षता ठेवल्या. मग "सोने घेया : सोने घेया" असे म्हणाले. तेथे काही सुवर्ण मोहरा उधळल्या. मग प्रदक्षिणा केली आणि सर्वज्ञ तेथून निघाले. मग सीमोलंघनाहून गावामध्ये येतांना उत्तर नगरमहाराद्वाराबाहेर राजा रामदरण्याच्या आईने मंगल आरती ओवाळली. तेथून सर्वज्ञ देव्हार चौकिला आले.....
*हिंदी अर्थ*
सर्वज्ञ अचलपुर मे रह रहे थे। दशहरा की सुबह सर्वज्ञ का मंगल स्नान हुआ , पूजा हुई, भोजन हुआ । फिर सर्वज्ञ राज्य धर्म के अनुसार राज्य से बाहर जाते है। सर्वज्ञ को घोड़े पर बिठाया गया। एक बढ़िया जरतारी झालरदार परिधान पेहणाया गया। श्रीमुगुता पर जरतारी पगड़ी पहनाई जाती है। पुष्प माला अर्पित की गई। सर्वज्ञा का घोड़ा आगे था, जिसके पीछे राजा रामदरना घोड़े पर बैठे थे। उसके बाद सेना समेत तमाम सरदार धूमधाम से चल रहे थे। ऐसा जुलूस गांव के उत्तरी नगर महाद्वार से नगर की उत्तर दिशा की ओर गया। गाँव के उत्तर में एक तालाब था। तालाब के उत्तरी किनारे पर एक अश्मंतक का पेड़ था। उस स्थान पर सर्वज्ञ अपने घोड़े से उतरे। उस स्थान पर पाँच सुपारी और चावल रखे । तब उन्होंने कहा, "सोना लो: सोना ले लो।" वहा कुछ खर्च किया और परिक्रमा कर वहां से चले गए। वापिस निकलते समय रामदरना की मां ने मंगल आरती की। यह चरित्र शोधकारो का है।
*इंग्लिश अर्थ*
Sarvagnya resided in Achlapur. On the auspicious morning of Dussehra, Sarvagnya performed his morning ablutions, offered prayers, and partook of a meal. Thereafter, adhering to the royal customs, he departed from the kingdom. Sarvagnya was seated upon a steed, adorned in a magnificent, fringed attire. A ceremonial turban was placed upon his head, and floral garlands were offered. Sarvagnya's horse led the procession, followed closely by King Ramadarna, also mounted on horseback. Behind them marched the entire army, along with the nobles, in a grand display.
This procession emerged from the northern gate of the village and proceeded towards the north. North of the village was a pond. On the northern bank of this pond stood an Ashtamanka tree. At this spot, Sarvagnya dismounted. Five betel nuts and rice were placed there. Then, he uttered, "Take gold, take gold." A certain amount was spent there, and circumambulations were performed before departing from that place. Upon returning, Ramadarna's mother performed a mangal arti. This narrative is a testament to the scholars.
राघव बिडकर महानुभाव
*संचालक*
श्रीकृष्ण मंदिर, प्रतापगढ़,जम्मू
एकांतिका, श्रीब्रह्मविद्या अध्ययन केंद्र
8999021241