प्रवास गडांचा व्यापक संकल्पना ..
--------------------------------------
सह्याद्री म्हणजे.रायगडावरची मेघडम्बरी..
कळसूबाईच्या मंदिरातून ऐकू येणारा घंटानाद..
हरिषचंद्रगडावर मारलेली पाण्यातली प्रदक्षिणा..
राजगडचा नेढ़यातुन वाहणारा तूफ़ान वारा..
छातीत धड़की भरवणारे कोंकण कडयाचे अभेद्य कातळ..
नाणेघाटाचा वेडावणारा अंगठा..
भिमाशंकराची शिडिची वाट..ढाक भैरीची गुहा..
जावळीचे जंगल तुडवताना लागलेली धाप..
नेसरीचा खिंडित घुमलेली हर हर महादेवाची गर्जन “सह्याद्री” माझा कालातीत गुरु.
जगावेगळा शिक्षक. या गुरुने मला विराट अजस्त्र कड्यांमधून एक शाळा चालवली. धबाबा कोसळणारे जलप्रपात, घनदाट निबीड अरण्ये, निसरड्या रानवाटा, शीळ घालणारा वारा, रक्तपिपासू जळवा, अवखळ निर्झर, श्वापदांची भीती, निरभ्र आकाशातला चांदण्यांचा खेळ अशा अनेक गोष्टींमधून जीवनाचे एक तत्त्वज्ञान शिकवले. ते मला तथाकथित पारंपारिक शाळेत कदाचित कधीच मिळाले नसते.
-------------------------------------
शिवराय म्हटल कि काही तरी मनाची वेगळी घालमेल ...
ज्यांनी अवघ आयुष्य रयतेच्या सुखा साठी रुजू केल ..
अवघ्या मायभूमीला जुलमी राजवटीतून मुक्त केले ..
आणि ज्या युग पुरुषाने मरणाला आव्हान केले ..
अशा युग पुरुषांच्या म्हणजे...
शिवशंभु चरणी हे पेज अर्पण ...