Chintamani Museum,Theur

Chintamani Museum,Theur A Unique Artful Huge Museum of Images And Articles Texts About Shree Ganesh (Shree Chintamani Ganesh Images Articles Museum Trust. Mukund Shankar Agalave.

Theur,Pune)

Founder of this Project Shri. Is a hereditary priest of Shree Chintamani at Theur. He is an Advocate by profession. This Project was initiated since 2004 through his faith in Shree Chintamani so that the devotees and visitors coming to Theur can observe various Images Forms, Articles, Literature etc. In respect of Shree Ganesh at one place – Theur. and they will prosper in Knowledge.

Image Form of Shree Ganesh are scattered all over world, India (Bharat) and Maharashtra. Some is the case with articles, Information, Data, Texts and Literature related to Shree Ganesh. Now a days due to long distance and busy schedule, it become quite difficult for devotees and interested persons to reach all those for scattered places. There for this Museum Project is a humble effort to being, keep, store and reflect these various Image forms, Articles, Information, Data, Texts and Literature related to Shree Ganesh at One Place in order to make it convenient to the devotees and interested person to observe and pray at one place – Theur. Information and Data of Shree Chintamani Ganesh in Dwapar Yug and Classic unique Paintings and Pictures. A unique and huge Museum of Images and Articles of Shree Chintamani Ganesh spread over 2000 Sq. Ft area at Theur- the only one in Maharashtra and Bharat.

भाऊबीज पोशाख सजावट..
29/10/2019

भाऊबीज पोशाख सजावट..

दीपावली पाडवा पोशाख सजावट श्री चिंतामणी थेऊर.🙏
28/10/2019

दीपावली पाडवा पोशाख सजावट श्री चिंतामणी थेऊर.🙏

लक्ष्मीपूजना निमित्त श्री चिंतामणी मंदिर थेऊर येथे केलेली आकर्षक सजावट..🙏
28/10/2019

लक्ष्मीपूजना निमित्त श्री चिंतामणी मंदिर थेऊर येथे केलेली आकर्षक सजावट..🙏

भाद्रपद द्वार यात्रा पोशाख व भाद्रपद श्री गणेश चतुर्थी निमित्त रात्रीं 12.30 ला होणारी श्री चिंतामणी महापूजा,पोशाख, छबिन...
14/09/2018

भाद्रपद द्वार यात्रा पोशाख व भाद्रपद श्री गणेश चतुर्थी निमित्त रात्रीं 12.30 ला होणारी श्री चिंतामणी महापूजा,पोशाख, छबिना , मंदिर सजावट व महाआरती नंतर होणारी आतिषबाजी..

Shri Chintamani Theur Ganesh Chaturthi poshakh
26/08/2017

Shri Chintamani Theur Ganesh Chaturthi poshakh

श्री चिंतामणी मंदिर थेऊर. गणेश जयंती पोशाख व सजावट..
12/02/2016

श्री चिंतामणी मंदिर थेऊर. गणेश जयंती पोशाख व सजावट..

मकरसंक्रांती पोशाख
16/01/2016

मकरसंक्रांती पोशाख

भाउबीज पोशाख श्री चिंतामणि थेउर......
13/11/2015

भाउबीज पोशाख श्री चिंतामणि थेउर......

श्री चिंतामणी थेऊर.. दीपावली पड़वा पोशाख..
12/11/2015

श्री चिंतामणी थेऊर.. दीपावली पड़वा पोशाख..

श्री चिंतामणी थेऊर..  लक्ष्मीपूजन पोशाख....
11/11/2015

श्री चिंतामणी थेऊर.. लक्ष्मीपूजन पोशाख....

11/11/2015

🚩लक्ष्मीपूजन 🚩

दिवाळीचा ४ था दिवस (दि.११/११/२०१५)

अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जातं. नरकचतुर्दशी मागोमाग दीपावलीतला महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा समजला जातो. यादिवशी घरं, दुकानं, कारखाने, कार्यालयं आदी वास्तू झेंडूच्या तोरणांनी, फुलांच्या माळांनी सुशोभित केल्या जातात.

यादिवशी पूजा करताना चौरंगावर सुंदर नवं वस्त्र अंथरतात. त्यावर तांदूळ पसरतात. लक्ष्मीपूजनाच्या पूजाविधीचा मंगल सोहळा पाहण्या सारखा असतो. त्यावर मध्यभागी लक्ष्मीची पावलं (पद्मजा) ठेवली जातात. त्याच बरोबरीने लक्ष्मीची सुवर्णमुद्रा (सोन्याची), रजतमुद्रा (चांदीची), कुबेराची प्रतिमा ठेवून (जशी तुमच्याकडे प्रथा असेल त्याप्रमाणे )
संकल्प :-
‘मम सर्वापच्छान्तिपूर्व दीर्घायुष्य बलपुष्टिनैरुज्यादि सकल शुभफल प्रीत्यर्थं गजतुरगराज्यैश्वर्यादि सकल संपदाम् उत्तरोत्तराभिवृद्ध्यर्थं इंद्रकुबेरसहित श्रीलक्ष्मीपूजनं करिष्ये ।’
असा संकल्प सोडून पूजा केली जाते.

गोरसापासून (गाईच्या दुधाचा खवा) तयार केलेला लवंग, वेलची, साखर, केशरयांच्या मिश्रणाने (स्वादिष्ट) रुचकर असा नैवेद्य लक्ष्मीला अर्पण करून साळीच्या लाह्या, धणे, गूळ, बतासे, विविध प्रकारचा सुकामेवा असे सर्व पदार्थ लक्ष्मीला वाहून यासाऱ्यांची आपल्याकडे समृद्धी असावी अशी कामना केली जाते.

प्रसाद म्हणून हे सर्व पदार्थ उपस्थितांना इष्टमित्रांना, गोरगरिबांना वाटण्यापूर्वी उपस्थित मंडळी लक्ष्मीमातेची हात जोडून मनोभावे प्रार्थना करतात.

💥त्यावेळी पुढील श्लोक म्हटला जातो-
‘नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूया तव दर्शनात् ।’
(अर्थ :- भगवान महाविष्णूला लाडक्या असणाऱ्या, सर्व देवगणांना वरदानाने अभय देणाऱ्या हे महालक्ष्मी, तुझाच आश्रय मानणाऱ्या शरणागतांना मिळणारे सर्व ऐश्वर्य, महाभाग्य मला तुझ्या दर्शन पूजनाने लाभू दे)

या मंत्राने लक्ष्मीची आणि
‘ऐरावतसमारूढो वज्रहस्तो महाबलः । शतयज्ञाधिपो देवस्तस्मा इंद्राय ते नमः ।’
या मंत्राने इंद्राची तसेच,

‘धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च । भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदः।’
(अर्थ :- निधिपती, पद्मपती असणाऱ्या, धनसंपत्ती देणाऱ्या महाराजा कुबेर ! तुझी कृपादृष्टी माझ्यावर ठेव. तुझ्या कृपादृष्टीमुळे धनधान्य, ऐश्वर्य सर्व काही लाभू दे .)
या मंत्राने कुबेराची प्रार्थना करावी.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री न झोपता जागर करावा. गीत, नृत्य, वाद्य, संगीत सेवा राजोपचार पूजा म्हणून जगदम्बिका लक्ष्मीला सादर करून रात्र जागवतात.

तसेच उत्तमोत्तम फळे, फुले व सुगंधित धूपदीपादी उपचार असावेत. संपूर्ण दिवस ब्रह्मचर्यात राहून उपवास वा नक्त-व्रत करावे. लक्ष्मीपूजनात लेख साहित्यासह पुढील वर्षाच्या जमाखर्चाच्या वह्या मांडून पूजा करण्याचा प्रघात व्यापारी व सावकार यांच्यात आहे व लक्ष्मीपूजना नंतर शुभवस्त्रे व अलंकार धारण करून ब्राह्मण, आप्तइष्टांसह भोजन करावे. रात्री घरात व घराभोवती दिवे लावून जागरण करावे.

आपणा सर्वांना दिपावलीतील लक्ष्मीपूजनाच्या अनेक अनेक मन:पूर्वक कोटी कोटी शुभेच्छा .🙏
🚩!! शुभं भवतु !!🚩

07/11/2015

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌋🌋🌋🌋🌻🌻🌻🌻🌻
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.

7 Nov.- वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !🐮🐮🐮🐮🐮🐮🐮🌹🌹

9 Nov. धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !👑👑👑👑👑👑👑👑👑

10 Nov. नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

11 Nov. लक्ष्मिपुजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !🍁🍁🍁🌻🌻🌻🍁🍁🍁
12 Nov. पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

13 Nov. भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहो दे !
👫👫👫👫👫👫🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ...👏👏👏👏
💐💐💐💐💐💐💐💐💐

Address

At Post Theur.
Pune
412110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chintamani Museum,Theur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to Chintamani Museum,Theur:

Share